महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका करत असताना, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी मोठे निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला विशेष महत्त्व होते. या बैठकीत ३८ महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
ज्यामध्ये होमगार्डच्या भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयामुळे सुमारे ४० हजार होमगार्डांना लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्रातील ३० सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे ४० हजार होमगार्डांना याचा लाभ होणार आहे.
होमगार्डच्या एकूण वेतनात किती वाढ झाली याचे तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत, मात्र मंत्रिमंडळाने त्यांच्या भत्त्यात महत्त्वपूर्ण वाढ जाहीर केली आहे. याबाबत अधिकृत तपशील राज्य सरकारकडून जाहीर होताच, वेतनवाढीचा नेमका आकडा समजेल.
राज्यातील होमगार्ड्सच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज (1 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयाचा लाभ जवळपास चाळीस हजार होमगार्ड्सना होणार आहे.
सध्या या होमगार्ड्सना कर्तव्य भत्ता म्हणून दररोज 570 रुपये मिळतात. सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता हाच कर्तव्यभत्ता आता तेट 1 हजार 83 रुपये करण्यात येईल. याशिवाय उपहार भत्ता दोनशे रुपये, कवायत भत्ता 180 रुपये, खिसा भत्ता शंभर रुपये, भोजन भत्ता 250 रुपये अशी जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 795 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे.