सर्व शाळांना दिवाळी सुट्टी तारीख जाहीर ! संपूर्ण यादी पहा

Diwali School Holiday List 2024 : शालेय सुट्ट्या हा विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठीही फार महत्वाचा विषय असतो. शाळा सुरू व्हायला अजून विलंब असला तरी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुट्ट्या जाहीर झाला आहेत. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक सुट्ट्या ७६ दिवसांच्या तर वर्षातील रविवार, असे मिळून यंदा १२४ दिवस शाळा बंद राहणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या १२ दिवसांच्या असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी साडेदहा ते पाच वाजेपर्यंत भरतील. अर्ध्या दिवसाच्या शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या कामकाज दिवशी ६० मिनिटांची मोठी सुट्टी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या दोन लहान सुट्ट्या असतील.

प्राथमिक शाळा सतत तीन दिवस बंद राहणार नाहीत, याची दक्षता मुख्याध्यापकांनी (गावची यात्रा असा अपवाद वगळता) घ्यायची आहे. यादीतील सुट्ट्या सोडून इतर दिवशी थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी असल्यास त्या दिवशी शाळा भरवून विविध स्पर्धांचे आयोजन करावे. २६ नोव्हेंबर रोजी शाळेत संविधान दिन साजरा करावा, असेही स्पष्ट केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना यावर्षी दिवाळीची सुट्टी खाली दिलेल्या तारखेपासून लागणार आहे.

२८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर (दीपावली सुटी)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews