278 प्रवाशांना घेऊन जाणारी ‘बोट’ समुद्रात अचानक बुडाली, घटनेचा व्हिडिओ आला समोर

समुद्रात बोट बुडण्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यात २३ लोकांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला आहे आणि ४० जणांना वाचविण्यात आले आहे, तर ६४ लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे बोट उलटल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

हा व्हिडिओ राणा संघा या एक्स (माजी ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॉयटर्स आणि असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थांनी या घटनेचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी ही घटना आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) देशातील असल्याची पुष्टी केली आहे.

रॉयटर्सने २ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, काँगोमधील किवू सरोवर (Lake Kivu) येथे गुरुवारी एका बोटीत २७८ प्रवासी होते, त्यातील ७८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना काँगोच्या गव्हर्नरने अधिकृतपणे जाहीर केली आहे. या अपघातानंतर अजूनही काही प्रवासी बेपत्ता असल्याने शोधकार्य सुरू आहे.

तुम्हाला या घटनेचा अधिकृत व्हिडिओ मिलेनियल या एक्स अकाऊंटवरून देखील पाहता येईल.

Leave a Comment

Close Visit agrinews