लाडकी बहीण योजनेची अर्ज मुदतवाढ; महिला भगिनींना मिळाली आणखी एक संधी


राज्यात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यात 5 महिन्यांचे हफ्ते सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. राज्यातील महिला भगिनींसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याची मुदत आता 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींनी अद्याप अर्ज भरले नाहीत, त्या आता अर्ज करू शकतात.

👉👉लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा?👈👈

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फतच भरावेत, अशी शासनाची सूचना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली आहे, आणि पुढील 4 दिवसांत अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येईल.

👉👉लाडकी बहिण योजना पात्र महिलांची यादी पहा 👈👈

राज्यात लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाल्याने राज्य सरकारने योजनेला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती. त्यानुसार, गेल्या महिन्यात लाखो महिलांनी अर्ज सादर केले, आणि त्या महिलांना योजनेचा लाभही मिळण्यास सुरुवात झाली आहे.

👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने योजनेच्या पहिल्या हफ्याचे वितरण सुरू केले होते. आतापर्यंत 2 कोटी 30 लाख महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, आणि त्यांचे पैसे बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत. बहुतांश महिलांच्या खात्यात 5 हफ्ते म्हणजेच 7500 रुपये जमा झाले आहेत.

आता उर्वरित महिलांनाही 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मात्र, या अर्जांसाठी फक्त अंगणवाडी सेविकांच्याच माध्यमातून अर्ज भरता येईल, अशी सूचना आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews