Employees Salary – ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच होणार २५ ऑक्टोबरपर्यंत वेतन करण्याचे आदेश

Employees Salary – ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच होणार

महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात २५ ऑक्टोबरपर्यंत वेतन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

👉👉फक्त या लाडक्या बहिणींना मिळणार मोफत 3 गॅस सिलिंडर, तुम्हाला मिळणार का?👈👈

२५ ऑक्टोबरपर्यंत वेतन करण्याची मागणी

शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी मागणी केली होती की ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच, म्हणजे २५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात यावे. या मागणीवर विचार करून संबंधित विभागांना २५ ऑक्टोबरपूर्वी वेतन करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈👈

अर्थमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

या मागणीला अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी म्हणजेच २५ ऑक्टोबरच्या आत दिले जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवेदनाचा ई-मेल पाठवला

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्त विभागाच्या सचिवांच्या कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर या संदर्भात संबंधित विभागांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Close Visit agrinews