दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या व महिलांच्या खात्यात 7000/- रुपये
लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 3000 रुपये देण्यात येत आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबरमध्येच वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात एकूण 3000 रुपये जमा होत आहेत.
लाडकी बहिण योजनेची नवीन यादी जाहीर
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 18 हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम दौऱ्यावर असताना योजनेच्या हप्त्याचे वितरण केले. या योजनेच्या 18 व्या हप्त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जात आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये
राज्य सरकारने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये वितरित केली जाते. पाचव्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून, पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जात आहेत.
एकूण 7000 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये, आणि पीएम शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळून एकूण 7000 रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात. यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तींनी या तिन्ही योजनांचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्यास आणि शेतकरी योजनांमध्ये पात्रता असल्यास, दिवाळीपूर्वी त्यांना एकूण 7000 रुपये मिळतील.